Mahakaleshwar

*✍️प्रेस नोट :*


*जळगावात साकारणार भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दिव्य दर्शन*
*ब्रह्माकुमारीज् ची प्रथमच भव्य शिवलिंगाची निर्मिती — भक्तांसाठी अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती*


जळगाव (प्रतिनिधी)


ब्रह्माकुमारीज् तर्फे जळगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक चेतनेचा अद्भुत संगम साकारत आहे. स्वयंभू, जागृत आणि कल्याणकारी परमेश्वर भगवान महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिव्य स्मरणार्थ भव्य शिवलिंगाची प्रेरणादायी प्रतिकृती जळगावात प्रथमच उभी राहत आहे. हे दर्शन भक्तांसाठी केवळ दृश्य नव्हे, तर आत्मिक अनुभूती आणि दिव्य प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे. सदरहू आयोजन हे रायसोनी स्कूलच्या पूढील, पूलाखालून जातांना उजवीकडील बेंडाळे ग्राऊंड, पिंप्राळा रोड , पिंप्राळा येथेआहे.


*जागृत शिवलिंगाची प्रेरक प्रतिकृती*


भारतभूमीतील जागृत ज्योतिर्लिंगांची आध्यात्मिक ऊर्जा जळगावात अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. सुमारे वीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या भव्य ज्योतिर्लिंग दर्शन स्थळावर भक्तांना शिवभक्तीचा अनोखा अनुभव मिळणार आहे.


*राजयोग आणि अध्यात्माचा दिव्य संगम*


या भव्य आयोजनात भक्तांसाठी विशेष राजयोग ध्यानकक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. येथे आत्मशांती, मनःशुद्धी आणि ईश्वरी अनुभूतीचा मार्ग दाखवणारे राजयोग ध्यान शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय आध्यात्मिक चित्र स्पष्टीकरण कक्ष उभारण्यात आला असून, चित्रांच्या माध्यमातून शिवतत्त्व, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचे सुंदर दर्शन घडवण्यात येणार आहे.


*भगवान महाकालेश्वराचे भव्य शिवलिंग*


या आयोजनाचे मुख्य आकर्षण म्हणजे भगवान महाकालेश्वराचे भव्य शिवलिंग. भक्तांच्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने निर्मित हे शिवलिंग जणू भक्तांना शिवसाक्षात्काराची अनुभूती देईल.


*लाईट अँड साऊंड शोद्वारे शिवमहिमा*


आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सादर होणाऱ्या लाईट आणि साऊंड शोद्वारे भगवान शिवाची महिमा, त्यांचे लीलाचरित्र आणि आध्यात्मिक संदेश प्रभावीपणे सादर करण्यात येणार आहेत. या दिव्य प्रकाश-ध्वनी प्रदर्शनामुळे भक्तांच्या मनात भक्तीभाव अधिक दृढ होणार आहे.


*महाआरती आणि प्रसाद*


दररोज सकाळ आणि संध्याकाळी भक्तीमय वातावरणात महाआरती होणार असून, भाविकांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. आरतीच्या पवित्र सुरांनी आणि मंत्रोच्चारांनी संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे.


*शुभहस्ते उद्घाटन*


या भव्य ज्योतिर्लिंग दर्शनाचे उद्घाटन राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या पावन प्रसंगी स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख, चिमुकले राममंदिराचे दादा जोशी, भवानी मंदिर पिंप्राळाचे पूजारी, जळगाव गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


*संकल्पना आणि आयोजन*


या दिव्य उपक्रमाची संकल्पना व निर्मिती धीरज सोनी यांनी केली असून, आयोजन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, ढाके कॉलनी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.


*तयारी पूर्णत्वास — भाविकांसाठी खुले दर्शन*


सदर भव्य ज्योतिर्लिंगम् शिवलिंग निर्मितीची तयारी पूर्णत्वास आलेली असून, शनिवार सकाळपासून भाविकांसाठी दर्शन खुले होणार आहे.
दररोज सकाळ आणि संध्याकाळी महाआरती तसेच प्रसादाचे आयोजन होणार आहे.


या दिव्य दर्शनाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन राजयोगीनी ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी व संकल्पक धीरज सोनी यांनी केले आहे. या मेळाव्याचे स्थान रायसोनी स्कूलच्या पुढील प्रांगण, प्रिप्राळा रेल्वेगेटच्या पुढे, उडडान पुला जवळ, जळगाव हे आहे




*विशेष आकर्षण*


• संगमयुगात परमपिता परमात्मा शिव यांच्या दिव्य अवतरणाचा पावन संदेश प्रत्येक आत्म्यापर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त संकल्पनेतून, तसेच ९० व्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने, जळगावात अद्वितीय आणि प्रेरणादायी आध्यात्मिक उपक्रम साकारत आहे.


• या दिव्य आयोजनात १२ ज्योतिर्लिंगांच्या ज्ञानयुक्त सेवांचे दर्शन भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासोबतच, विश्वप्रसिद्ध उज्जैन येथील महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून, भक्तांसाठी ती विशेष आकर्षण ठरणार आहे.


• परमपिता परमात्मा शिव यांचा सत्य परिचय सर्वांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शिवध्वजाच्या संकल्पनेत उभारलेले प्रदर्शनी कक्ष तयार करण्यात आले आहेत. येथे चित्र, संदेश आणि आध्यात्मिक विचारांच्या माध्यमातून शिवतत्त्व, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचे सुस्पष्ट दर्शन घडवण्यात येणार आहे.


• भाविकांच्या आत्मशांतीसाठी विशेष राजयोग मेडिटेशन कक्ष उभारण्यात आला असून, येथे राजयोग ध्यानाची अनुभूती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.


• या सर्व आध्यात्मिक साधनांनी समृद्ध असलेली पंधरा दिवस चालणारी दिव्य सेवा विधिवत आणि भक्तिमय वातावरणात शुभारंभित होत आहे. ही सेवा केवळ कार्यक्रम नसून, प्रत्येक आत्म्यासाठी आत्मजागृती, शांती आणि परमात्म अनुभूतीचा पावन मार्ग ठरणार आहे.


या संपूर्ण कार्यक्रमासाठी वेबसाईट
www.bkdpstc.com\mahakaleshwar

About Author

दिव्य प्रकाश सरोवर

ब्रह्माकुमारीज़ दिव्य प्रकाश सरोवर प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र में जलगाँव स्थित अपने प्रकार का पहला बहु-आयामी प्रशिक्षण केंद्र है, जो देश के मध्य भाग में स्थित है। यह आत्मचिंतन और आत्मविकास का एक ऐसा स्थान है, जो हजारों लोगों की आत्मा को परमात्मा से शक्ति लेकर प्रफुल्लित करता है। परिसर का शांत वातावरण, सुंदर प्राकृतिक सज्जा और हरियाली आधुनिक जीवन की भागदौड़ से दूर होकर आंतरिक शांति और शक्ति को पुनः प्राप्त करने के लिए एक आदर्श स्थल है।

Follow Us On Social Media

Editor’s Picks