
✍️प्रेस नोट :
गुंज रहा है शिवका संदेश, सुनलो सभी दिशाओं में … शिवमहिमा गजरात शिरसोली प्र.बो. शिवमय ;
🔱ब्रह्माकुमारीज् तर्फे शिवसंदेश बारा ज्योतिर्लिंग दर्शन महोत्सव भक्तिभावात संपन्न
शिरसोली प्र.बो. (जळगाव) :
▪️महाशिवरात्री व त्रिमूर्ती शिवजयंतीच्या पावन पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने दक्षेश्वर महादेव मंदिर प्रांगणात शिरसोली प्र.बो. येथे आयोजित करण्यात आलेला भव्य “बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन महोत्सव” हर हर महादेवच्या जयघोषात व भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
▪️दि. १ ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या त्रिदिवसीय महोत्सवात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. बारा ज्योतिर्लिंगांचे भव्य दर्शन, शिवसंदेश देणारी प्रवचने, भक्तिगीते व महाआरती यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
▪️महोत्सवाचे उद्घाटन ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका राजयोगिनी मिनाक्षी दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांनी शिवतत्त्वाचे आध्यात्मिक रहस्य उलगडून शांत, व्यसनमुक्त व मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश दिला.
🔅या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर किर्तनकार महाराज, प्रभाकर शिंपी किर्तनकार महाराज तसेच ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती जागृतीपर प्रबोधन, शिवसंदेश पदयात्रा, बारी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जनजागृती ही महोत्सवाची विशेष आकर्षणे ठरली.
🔅कार्यक्रमास सरपंच नितीन अर्जुन बूंदे, उपसरपंच दिगंबर रामकृष्ण बारी, पोलिस पाटील श्रीकृष्ण रामदास बारी, समाजसेवक गिरीश वराडे, बँक व्यवस्थापक हेमंत पाटील, बारी स्कूल अध्यक्ष निलेश बारी, मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्यासह अनेक शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तीन दिवसात श्रीमदभगवद गीतेच्या श्लोकांवर आधारीत स्वत: ची ओळख, परमात्म्याची ओळख, कर्माचा गूह्य गती यावर निरुपण करण्यात आले.
🔅नवनाथ संप्रदायातून आलेले सागर महाराज यांनी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेत प्रदर्शनाचे अवलोकन केले. त्यानंतर त्यांनी परमात्मा ज्ञानाचा लाभ घेत ईश्वरीय सौगात व प्रसाद स्वीकारला. तसेच महा मृत्युंजय मंदिरातून पधारलेल्या साधूंनी शिरसोली येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घेतले. वाराणसी (काशी) येथून आलेले महाराज जितेश्वर उपाध्याय व त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते. शिवसंदेश महोत्सव यशस्वी होण्यासाठी ब्रह्माकुमारीज् परिवार तसेच शिरसोली वासीयांचे सहकार्य लाभले.
🔅तीन दिवसीय शिवसंदेश महोत्सव संपल्यानंतर राजयोग प्रवचनमाला शिबिरात सहभागाचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.
सूत्रसंचलन ब्रह्माकुमारी वर्षा बहन यांनी केले तर आभार ब्रह्माकुमारी तेजल दीदी यांनी मानले.
फोटो कॅप्शन : शिवसंदेश महोत्सवाचे उदघाटन करतांना मान्यवर व शिवभक्त
संबंधित व्हिडिओ
https://www.youtube.com/playlist?list=PLB1EYWCneKQ_ibzsbjfvy3nR2I2GkTiDU
☀️वृत्तसंपादन
✍️डॉ. सोमनाथ वडनेरे
महाराष्ट्र राज्य माध्यम समव्यक,
मीडिया प्रभाग माऊंट आबू
9850693705
▪️ मीडिया संदर्भातील अधिक माहितीसाठी Website
shirsoli_shivsandesh
ब्रह्माकुमारीज् तफे शिरसोली प्र.बो. येथे त्रिमूर्ती शिवजयंती व
महाशिवरात्रीनिमित्त भव्य बारा ज्योतिर्लिंग दर्शन महोत्सव
व्यसनमुक्ती जागृतीपर प्रबोधन आणि इतर उपक्रमांचेही आयोजन
शिरसोली प्र.बो. (जळगाव) :
महाशिवरात्रीचा पावन पर्व भक्तिभावाने साजरा करण्याच्या उद्देशाने ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने शिरसोली प्र.बो. नगरीत प्रथमच भव्य आणि ऐतिहासिक “बारा ज्योतिर्लिंग शिवदर्शन” महोत्सवाचे
आयोजन करण्यात आले आहे. हा त्रिदिवसीय शिवसंदेश महोत्सव रविवार दि. १ फेब्रुवारी ते मंगळवार दि. ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले असून, प्रमुख उपस्थिती म्हणून ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका राजयोगिनी मिनाक्षी दीदीजी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचे भव्य दर्शन, शिवसंदेश, आध्यात्मिक प्रेरणादायी कार्यक्रम, व्यसनमुक्ती मार्गदर्शन तसेच भक्तिमय वातावरणात महाआरतीचे आयोजन सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भाविकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी तेजलदीदी आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा महोत्सव बाजार पट्टा, दक्षेश्वर मंदिरासमोर, शिरसोली प्र.बो., तालुका व जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पावन प्रसंगी भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून शिवभक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९६३७१५१३६७. वेबसाईट – www.bkdpstc.com\shirsoli_shivsandesh






